!! हरवली पाखरं...शाळा बंद!!
एक डिसेंबरला माझी पाखरं गोंधळलेल्या अवस्थेत शाळेच्या अंगणात आली.
ती मला उत्सुकतेने न्याहाळत होती, मीही त्यांना प्रेमाने बघत होती.
दोन दिवसातच आमची गट्टी झाली.बघता बघता माझी पाखरं चोच उघडू लागली.
मी त्यांना आनंदाने ज्ञानाचे दाणे भरवू लागली .
शब्दफुले ,कोण काय करतो, मैत्री, पतंग, क्रांतिवीर अशा अनेक हिंदोळ्यांवर माझी पाखरं उडू लागली.
उपक्रमात तर माझी पाखरं अशी भरारी घ्यायची की,मी ही थक्क व्हायची.
गोंधळलेल्या मनाने आता मैत्री विश्वासाची जागा घेतली होती.
अचानक 10 जानेवारी ची पहाट उजाडली,आणि माझ्या पाखरांविना मी व शाळा पोरकी झाली.
कारण होतं " पंधरा फेब्रुवारी पर्यंत *शाळा बंद" जिल्हाधिकार्यांचा आदेश, वरील आदेशाचं पालन तर करायचं होतं,पण माझं मन माझ्या पाखरांना शोधत होतं.
हेही दिवस जातील आणि माझी पाखरं पुन्हा शाळेत येतील.
हीच आशा मनात ठेवून मी रोज शाळेत येत आहे ,आणि माझ्या पाखरांना मी ऑनलाइन शिकवत आहे.
:- स्वरचित कविता :-
सौ.कविता संजय सोनवणे
(मराठी शिक्षिका)
पी.व्ही. एम.इंग्लिश मीडियम स्कूल (सी बी एस ई)चोपडा .
Comments