गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत होते. गुरुपौर्णिमेला ज्ञान आणि बुद्धीने आपले मार्ग प्रकाशित करणाऱ्या गुरू, शिक्षक आणि मार्गदर्शकांचा सन्मान करण्यासाठी समर्पित दिवस म्हणून त्याच उक्ती प्रमाणे गुरुपौर्णिमा हा दिवस संपूर्ण देशात साजरा केला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा म्हणजेच सामाजिक चळवळ, शैक्षणिक, थोर महापुरुष, क्रांतिकारी,परिधान करीत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. त्या दिवसाचे महत्त्व पटवून दिले त्याप्रसंगी प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक मा श्री रजीश बलन सर उपमुख्याध्यापिका सौ निखिला मॅडम यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन सौ ज्योती टीचर तसेच कार्यक्रम यशस्वीरित्यासाठी सौ चेतना टीचर सहकार्य केल. त्याचबरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी सहकार्य केले, त्याचबरोबर या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला..
top of page
bottom of page
Yorumlar