दिनांक 3 व ४जानेवारी रोजी शाळेत सावित्री बाई फुले जयंतीनिमित्त "सावित्रीच्या लेकी" कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमात कविता सोनवणे (मराठी शिक्षिका) यांनी प्रास्ताविक सादर करून सावित्रीबाईंना अभिवादन केले व कार्यक्रमाची सुरुवात झाली; त्यानंतर सावित्रीबाईंच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात प्रामुख्याने रोशनी बडगुजर, मैञेयी कडाले, सावी महाजन, स्वरा बाविस्कर, या विद्यार्थ्यांनींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला.तसेच सर्वांनी सावित्रीबाईंकडून प्रेरणा घेऊन जीवनात यशस्वी होण्याची शपथ घेतली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदविला त्याबद्दल त्यांचे खास कौतुक .तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ,उपमुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
top of page
bottom of page
Comments