Correspondent: Tr. Pratibha Dhangar
Date: 22 - June - 2023
Chopda
पी. व्ही. एम इंग्लिश मेडियम स्कूल चोपडा (सीबीएसई पॅटर्न )येथे दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस आणि अखेरीस आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन हे करत असतो. या शैक्षणिक वर्ष २०२३ते २४मध्ये देखील आम्ही सुरुवातीचे १० दिवस हा सांस्कृतिक कार्यक्रम पुढील प्रमाणे घेतला. १४/६/२०२३ ते २४/६/२०२३या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन केले.विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात आला सकाळी ७:५५ते ८:५५ पर्यंत या कार्यक्रमाचा कालावधी असायचा.या कार्यक्रमात विद्यार्थी विविध कृती करून दाखवत असतात .जसे की नाचणे ,कविता म्हणून दाखवणे ,गाणं म्हणणे ,१मि. चित्र काढने, जादू , नक्कल करणे तसेच सायंस चे प्रोजेक्ट सादर करणे.दररोज किमान २५ते ३० मुलांचा सहभाग असायचा. मुलांचा यत्तेनुसार समावेश असायचा ८:५५ ला हा कार्यक्रम राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हणून संपन्न व्हायचा. या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह हा दिसून येत असतो. आणि आम्ही त्यांचा प्रत्येकी चित्रफीत करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांपर्यंत पोहोचवत असतो. यामुळे त्यांना देखील आनंद वाटत असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून येण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारे दिनविशेष देखील आम्ही साजरा करतो. विद्यार्थ्यांना मनोरंजनाद्वारे अभ्यासाची आवड ही निर्माण होत असते .या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.शाळेत खेळीमेळीचे वातावरण तयार होत असते.विद्यार्थी- विद्यार्थी आणि विद्यार्थी -शिक्षक यांच्यात आंतरक्रिया सुलभ होत असते. प्रत्यक्ष कृती करून विद्यार्थ्यांमध्ये नवीन काही करण्याची क्षमता विकसित होते. या कार्यक्रमामुळे इयत्ता निहाय समतोल साधला जातो. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या शाळेत विविध कार्यक्रम साजरा करत असतो.
Comments