नूतन वास्तू आणि क्रिडास्थानक उद्घाटन समारंभ
- P.V.M. ENGLISH MEDIUM SCHOOL-CBSE PATTERN,CHOPDA
- Mar 2, 2024
- 1 min read
Correspondent: Tr. Pratibha Dhangar
Date: 12 - January - 2024
Chopda
नूतन वास्तू आणि क्रिडास्थानक उद्घाटन समारंभ
चोपडा ता चोपडा दि.६/१/२०२४ प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथील नूतन वास्तु , क्रिडास्थान उद्घाटन समारंभ सोहळा शाळा संस्था प्रेसिडेंट मा.शैलाबेन मयूर चेअरमन मा. श्री राजाभाई मयूर व्हाईस प्रेसिडेंट मा.विश्वनाथ अग्रवाल,सचीव मा.माधुरीताई मयुर, समन्वयक मा. गोविंदभाई गुजराथी, मा.संचालक माजी उपनगराध्यक्ष मा.भूपेंद्रभाई गुजराथी, मा.किरण गुजराथी,मा. शैलेंद्रभाई गुजराथी, आर.पी. गुजराथी सर यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमास राजाभाई मयूर आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री रजीश बालन सर यांच्या शुभहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. क्रीडास्थानाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच नूतन वास्तू फलकावर मजुरांचे मोठ्या मनाने नाव घेतले. यावेळी संस्था सचिव मा.माधुरीताई मयूर यांनी मनोगत व्यक्त केले नंतर मुख्याध्यापक सर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका श्रीम.निखिला मॅडम व सर्व शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते. यानंतर राष्ट्रीय गीताने कार्यक्रम समारोप झाला.
Comentarios