26-10-20219:00am
(Special correspondent).
चोपडा : चोपडा येथील चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या पी व्ही एम इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) शाळेतील शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या व कोविड १९ मुळे उशिराने निकाल लागलेल्या राज्यस्तरीय ऑलिम्पियाड परीक्षेत द्वितीय फेरीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन गुणगौरव करण्यात आला यात, निवेद रजीष (३री), वैभवी राजाराम पाटील (३री), अनिका शाम गुजराथी (४थी), अनुधी निलेश पालिवाल (४थी), वीर गौतम जैन (४थी), हाशिमा आसिफ बागवान (५वी) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, संस्थेचे व्यवस्थापक गोविंदभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचेही कौतुक करण्यात आले. यावेळी पालकांनी कोविड-१९ काळात व सद्यस्थितीत शाळेने राबविलेल्या उपक्रमांचेही कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रजीष बालन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments