Correspondent: Mr. Samadhan Mali
Date: 17 - July - 2024
Chopda, Jalgaon, Maharashtra
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित,प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा या ठिकाणी आषाढ एकादशीनिमित्त "महोत्सव विठ्ठलाचा-महागजर विठ्ठलाचा" वारकरी संप्रदायातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये विठ्ठल नामाचा गजर, वारकरी संप्रदायातील पारंपारिक वारकरी खेळ, लेझीम , टाळ मृदुंग,रिंगण सोहळा, फुगडी, विद्यार्थ्यानी भजन, भक्तिगीते असे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. संत व विठोबा- रुक्मणीच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. माऊली-माऊली व टाळ मृदुंगाच्या गजरात सारे वातावरण भक्तिमय झाले होते. त्याप्रसंगी प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक मा. श्री रजीश बालन सर, उपमुख्याध्यापिका सौ. निखिला मॅडम, संस्थेचे समन्वयक मा. श्री.गोविंदभाई गुजराथी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा झाला.
सर्व कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सौ चेतना बडगुजर मॅडम, श्री समाधान माळी सर त्याचबरोबर सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा केला..
Comments