प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल येथे कारगिल विजय दिवस साजरा
- P.V.M. ENGLISH MEDIUM SCHOOL-CBSE PATTERN,CHOPDA
- Jul 27, 2024
- 1 min read
26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. या दिवसाची आठवण करत प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा या ठिकाणी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करत सौ ज्योती टीचर तसेच सौ चेतना टीचर यांनी त्याचं महत्व पटवून दिले. शाळेच्या कॅम्पस परिसरामध्ये या दिवसाचं महत्त्व पटवता "हे मेरे वतन के लोगो" या गाण्यावर शहीद जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले.. त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रजीश सर , उपमुख्याध्यापिका निखिला टीचर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments