Correspondent: Miss. Manisha Sanjay Bari
पीव्हीएम इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापक श्री.रजीष बी. यांनी काल गोरगावले गावाला भेट दिली. गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे विश्लेषण करण्यासाठी त्यांनी गावाला भेट दिली. यावेळी मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापनातील श्री.गोविंद बी. गुजराथी आणि श्री.डी.टी. महाजन हेसुध्दा उपस्थित होते.
त्यांनी पालकांशी शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या शाळेत ये-जा करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा केली. पालकांशी संवाद साधताना श्री. गोविंद बी. गुजराथी यांनी चोपडा एज्युकेशन सोसायटी गेल्या १०४ वर्षांपासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देत असल्याचे प्रतिपादन केले. पालकांना दिलेली सर्व आश्वासने शाळा पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शाळेतील उपक्रम आणि विद्यार्थ्यांची कामगिरी पाहून पालक खूप प्रभावित झाले. पालकांच्या सभेनंतर, श्री. रजीष बालन यांना गेल्या वर्षी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमधून बेस्ट प्रिंसिपल अवार्ड (सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार) मिळाल्यानंतर त्यांची ही पहिलीच गावाला भेट असल्याने पालकांनी त्यांचा सत्कार केला.
Comments