चोपडा - सर्वदूर 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे,हा आहे.
हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून चोपडा येथील पी.व्ही.एम्.इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येही राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.21डिसेंबर ते 24 डिसेंबर या चार दिवसांमध्ये आमच्या शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. जसे. गणिताशी संबंधित विविध चार्ट्स बनविणे,वस्तू मोजणे, कुल्फीच्या काड्यांपासून रोमन नंबर बनविणे व सांगणे,रंगीत कागदांचे विविध आकार बनविणे,विविध परिमाणे वापरून मोजमाप करणे,अंक वापरुन संख्या बनविणे व सांगणे,इत्यादी.
या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वर्गांनूसार ऑनलाईन प्रश्नमंजूषा घेण्यात आली.या राष्ट्रीय गणित दिवसाच्या उपक्रमांसाठी शाळेचे मुख्याध्यापक रजीष बी., सर्व शिक्षकवृंद आणि पालक यांनी सहकार्य केले.
अशाप्रकारे,आमच्या शाळेमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Comments