Correspondent: Mrs. Kavita Sanjay Sonawane
1-12-2021आज दिनांक 2 डिसेंबर शासनाच्या नियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवी(गट- ब )च्या चिमुकल्यानी पी.व्ही. एम्.इंग्लिश मीडियम (C.B.S.E)स्कूलच्या नवीन इमारतीत आनंदाने व उत्साहाने प्रवेश केला.यावेळी मा.मुख्याध्यापक रजीष बी.व उपमुख्याध्यापिका सौ. निखीला रजीष.यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. वीस महिन्यानंतर शाळा सुरू झाली ,त्यात नवीन इमारत , यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वाखाणण्याजोगा होता.
विद्यालयात प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनर द्वारे तपासणी करण्यात आली.कोविड -19 सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा पुरवीत शाळेच्या वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.आज विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस खूप आनंद ,उत्साहात पार पडला.विद्यार्थ्यांचा जिज्ञासूपणा नवीन काही शिकण्याची तळमळ व उत्सुकता बघून सर्व पी.व्ही. एम.इंग्लिश मीडियम (C.B.S.E)स्कूल स्टाफ भारावून गेला.
पालकांनी शाळेवर विश्वास दाखवून पाल्यांचे संमती पत्रक भरून पाल्याला शाळेत पाठविण्यास संमती दिली.शाळा व पालकवर्ग यांनी मिळून जर यापुढेही असेच सहकार्य दर्शविले तर निश्चितच आपण कोरोनावर मात करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करु शकतो यात शंका नाही.
आज शाळेचा पहिला दिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करून आनंदात व उत्साहात पार पाडण्यासाठी पी.व्ही.एम. इंग्लिश मेडियम (C.B.S.E) स्टाफ यांनी परीश्रम घेतले.त्याबद्दल त्यांचे व पालकांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!
Commentaires