Correspondent: Mrs. Kavita Sanjay Sonawane
पी.व्ही.एम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ऑनलाईन शाळा चालू असली तरी सकाळी ऑनलाईन तासिका सुरू होण्याच्या पाच मिनिटं आधी विद्यार्थ्यांना लिंक पाठवून प्रार्थनेला उपस्थित राहण्यासंबंधी सूचना देण्यात येतात त्यानंतर लाऊड स्पीकरवर माझाच हिंद देश प्रार्थनेचे गायन ऐकवले जाते व विद्यार्थी त्या सूचनांचे पालन करून आपल्याच घरी परिपाठाचा आनंद घेत आहेत.
परिपाठ म्हणजे मुले/मुली विद्यार्थिदशेत असतानांच सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे साधन आणि हेच काम आपली शाळा ऑनलाइन सुरू असून देखील अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी उपक्रमशील परिपाठ राबवत आहे. आणि विद्यार्थी स्व आनंदाने यात सहभागी होतात ही स्तुत्य बाब होय.
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका शिक्षक वशिक्षिका तसेच कर्मचारीवर्ग परिश्रम घेतात.
Comments