Correspondent: Mrs. Kavita Sanjay Sonawane
28-06-2022
पी.व्हि.एम्.इंग्लिश मिडियम स्कूल ,चोपडा येथील माननीय उपमुख्याध्यापिका निखिला मॅडम यांना इंडियन टॅलेंट ऑलंपियाड तर्फे आदर्श प्रेरणादायी शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थी नेहमीच राज्यस्तरावर आपले छबी उमटवतात आणि याचे एकमेव कारण म्हणजे सौ निखिला मॅडम यांची प्रेरणा. मॅडम नेहमीच स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असतात. एवढेच नव्हे तर त्यांची अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरते. आणि म्हणूनच की काय इंडियन टॅलेंट ओलंपियाड स्पर्धेत आपल्या शाळेतील विद्यार्थी राज्य स्तरावर देखील अव्वल येतात. यासाठी मॅडम यांचे कौतुक करावे तेवढे कमीच....!!
पुनश्च एकदा सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांच्याकडून मॅडमांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...
Comments