Correspondent: Mrs. Kavita Sanjay Sonawane
दुसरा दिवस-
पी .व्ही.एम.इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) चोपडा,शाळेत "मराठी राजभाषा दिवस" (A ग्रुप विद्यार्थी) व( B ग्रुप विद्यार्थी) अशा प्रकारे दोन दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी देखील(A ग्रुप विद्यार्थी) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण मराठीत (प्रमाणभाषेत) परिपाठ ,उतारा वाचन, अक्षरांवरून कविता,सहज विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शुद्ध मराठीत देणे ,थोर संतांची माहिती,अशा उपक्रमांचा समावेश होता.
प्रथम सकाळचा परिपाठ इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी मराठीत सादर केला.यात कु.वैभवी पाटील हिने दिनविशेष ,चि. सत्यम पाटील याने सुविचार ,कु. वीरा पाटील हिने बातम्या सांगितल्या.
" उतारा वाचन" इयत्ता चौथीचा चि. सोहम पाटील यांने उत्कृष्टपणे केले.
त्यानंतर इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांनी "अक्षरा वरून कविता" सादर केल्या. चि.वंश जैन याने "ढ "अक्षरावरून कविता,कु. प्रेक्षा पटेल हिने "ग" या अक्षरावरून कविता, तर चि.हेमांशू सोनवणे याने "ट" या अक्षरावरून कविता सादर केली.मराठीची थोरवी ,विपुलता अनन्यसाधारण आहे आणि हेच दर्शविणारा उपक्रम म्हणजे "संतांची माहिती" हादेखील उपक्रम यावेळी घेण्यात आला. यात चि.दिव्येश पाटील याने "संत एकनाथां विषयी" माहिती सांगितली.
यानंतर "सहज विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शुद्ध मराठीत(प्रमाणभाषेत) देणे" हा उपक्रम घेण्यात आला.
यात शाळेतील शिक्षक शिक्षिकांसह विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाण्याजोगा होता.
सौ. संगीता गुजराथी, कल्याणी डोळे, या शिक्षिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांपैकी कु.अनुष्का नेवे,कु. दिपश्री सोनवणे, कु.वेदांती पाटील यांचा सहभाग होता.
आणि या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे यात शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक "रजीष सर "यांनी उत्साहाने भाग घेतला.
रजीष सर, केरळचे असले तरी त्यांनी मराठी राज्यभाषा दिवस साजरा करताना सगळ्याच उपक्रमांत उत्साह दाखविला एवढेच नाही तर विद्यार्थ्यांशी मराठीत संवाद देखील साधला. व सहजच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मराठी प्रमाण भाषेतून दिली ही बाब उल्लेखनीय आहे.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कविता सोनवणे यां नी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास पी .व्ही .एम .इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, शिक्षक शिक्षिका,विद्यार्थी व शिक्षकेतर
कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
Comments