Correspondent: Mrs. Kavita Sanjay Sonawane
पहिला दिवस-
पि.व्हि.एम्.इंग्लिश.मेडियम शाळेत मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय मुख्याध्यापक रजीष सर,उपमुख्याध्यापिका सौ निखिला मॅडम यांच्या हस्ते वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कविता सोनवणे यांनी केले.
यावेळी इयत्ता पाचवीच्या समूहाने "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" ही कविता सादर करून सर्वांनाच मंञमुग्ध केले. त्याचप्रमाणे कुसुमाग्रजांची " चिऊताई " ही कविता इयत्ता दुसरीची विद्यार्थ्यांनी कु.रेहांशी चौधरी हिने सादर केली.
यावेळी शाळेत मराठी विषय शिकविणाऱ्या सौ.चेतना बडगुजर,निशा रावताळे व कविता सोनवणे या शिक्षिकांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच मराठी भाषेची संपन्नता, विपुलता दर्शविणारे कविता गायन,उतारा वाचन, पुर्णविराम ची गंमत, योग्य अक्षरावर अनुस्वार लावणे इ.विविध उपक्रम घेण्यात आले. त्यापैकी "योग्य अक्षरावर अनुस्वार लावणे" यामध्ये चि.जिग्नेश सोनवणे, चि.कुणाल बारेला कु.रेहांशी चौधरी , इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. व इतर विद्यार्थ्यांनी देखील उपक्रमात सहभागी होऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक ,उपमुख्याध्यापिका शिक्षक, शिक्षिका तसेच कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
Comments