चोपडा : मंथन पब्लिकेशनने घेतलेल्या टॅलेंट सर्च परीक्षेत पीव्हीएम इंग्लिश मिडीयमचा विद्यार्थी वीर गौतम जैन याने उत्कृष्ट कामगिरी करत तालुका स्तरावर आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
त्याने परीक्षेत रोख पारितोषिक आणि पदक दोन्ही जिंकले आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीने शाळेला पुन्हा एकदा अभिमान वाटला. त्याने यापूर्वी इंडियन टॅलेंट परीक्षेतही 8 पदके जिंकली होती.
वीर हा शाळेतील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक आहे आणि त्याने नेहमीच स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यात रस दाखवला आहे. तो आता चौथीत शिकत आहे.
पि.व्हि.एम्.इंग्लिश.मेडियम(सी.बी.एस.ई) चे मुख्याध्यापक श्री. रजिष बालन यांनी वीरचे अभिनंदन केले आणि आज शाळेत त्यांना धनादेश सुपूर्द केला. त्याचे शिक्षक आणि वर्गमित्रांनीही कौतुक केले.
Opmerkingen