Correspondent: Mrs. Kavita Sanjay Sonawane
21-06-2022
शाळेत २१ जून योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता चौथीचा विद्यार्थी निवेद रजीष याने आपल्या जीवनातील योगासनांचे महत्त्व इंग्रजी भाषेतून व्यक्त केले. तसेच इयत्ता चौथीचा चा विद्यार्थी मोहित सोनवणे याने देखील योगासनांचे महत्त्व सांगितले तर वीरा पाटील या विद्यार्थिनीने
"सुर्यनमस्काराचे" प्रात्यक्षिक करून दाखवले.
योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय राजेंद्र आल्हाट सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. राजेंद्र सरांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व तर समजावून सांगितले परंतु विद्यार्थ्यांकडून काही योगासनांचे प्रात्यक्षिक देखील करून घेतले.
योगा दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक सर, उपमुख्याध्यापिका मॅडम सर्व शिक्षक, शिक्षिका यांनीसुद्धा
प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह तर ओसांडून वाहत होता. प्रत्येक विद्यार्थी हा मनापासून उत्साहाने योगासने करीत होता.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती टीचर यांनी केले. व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
Comments